Tuesday, July 30, 2019

                                         Exam Time 🔼🔻

रंगभरण


                                   रंगभरण 

Sunday, July 1, 2018

Wednesday, March 7, 2018




माता- पालक संघ मेळावा क्षणचित्रे 

Thursday, March 1, 2018



शालेय परिसर स्वच्छ करताना विद्यार्थींनी...

Monday, November 20, 2017

दि.२०/११/२०१७

       नमस्कार मित्रांनो,
                  नुकत्याच आमच्या शाळेत "चला खेळूया" हा उपक्रम दि.१४ नोव्हेंबर पासून राबविण्यात आला..या उपक्रमाचा मुख्य हेतू हा होता की प्रत्येक मूल हे खेळले पाहिजे , त्याला खेळाची आवड निर्माण झाली पाहोजे, त्यादृष्टीने आम्ही इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मैदानी खेळप्रकारात समाविष्ट करून त्यांचा आनंद द्विगुणित केला..
या उपक्रमात पुढील पैकी खेळ घेण्यात आले
30 मी. धावणे
झिगझ्याग रन
100,200,400,800 मी.धावणे
4x100रिले 
कबड्डी 
खोखो
भाला, गोळा,थाळी फेक
उंच व लांब उडी इत्यादी ...
                या उपक्रमात सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले...
            धन्यवाद।।।

Saturday, November 18, 2017





बँक ऑफ बडोदा शाखा कोपरगाव यांच्या वतीने आमच्या आश्रमशाळेतील इयत्ता दहावीची गुणवंत विद्यार्थिनी कु. सोनाली निकम हिचा सत्कार करण्यात आला.... त्याप्रसंगी बँकेचे पदाधिकारी व शिक्षकवृंद..



आदिवासी बाल विज्ञान परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इगतपुरी जि. नाशिक येथील  विज्ञान प्रदर्शनामध्ये आमच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ....यात विद्यार्थ्यांनी शेती व उपाययोजना नामक चित्रप्रदर्शनी लावली होती... 






संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय कोपरगाव या ठिकाणी इस्रो या संस्थेमार्फत वेगवेगळ्या अवकाश यानांचे व कृत्रिम उपग्रहांचे प्रदर्शन आयोजित केले होते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आमच्या शाळेने सुद्धा सदर प्रदर्शन भेटीचा आनंद लुटला.... याप्रसंगी संजीवनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मोलाची माहिती दिली...याप्रसंगी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते....






दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमच्या आश्रमशाळेत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला दि.१५ ऑगष्ट २०१७ रोजीचे क्षणचित्रे...


दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील आमच्या आश्रमशाळेत आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने टाकळी गावात विद्यार्थ्यांनी विविध आदिवासी  वेशभूषा करून उत्साहात, जल्लोषात, घोषणाच्या जयघोषात  फेरी काढली त्याची काही क्षणचित्रे...

ज्ञानराचानावाद पद्धतीने शालेय जीवनाचा आनंद घेताना इयत्ता पाहिलेचे विद्यार्थी 












सहशालेय उपक्रमांतर्गत आमच्या आदिवासी आश्रमशाळेत दहीहंडीचा उत्सव साजरा करताना विद्यार्थी , शिक्षक कर्मचारी ....

Tuesday, July 4, 2017

आमची इयत्ता १० वी ची सन २०१६-१७ चे सर्व विद्यार्थी निरोप समारंभ देते प्रसंगी टिपलेले हे क्षणचित्र


Tuesday, March 8, 2016

सन 2015-2016 या वर्षी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कबड्डी या खेळप्रकारात आमच्या आश्रम शाळेची विद्यार्थिनी कु.आरती पंडित इंगळे हिने चमकदार कामगिरी केली.


स्वातंत्र्यदिन २०१९

स्वातंत्र्यदिन २०१९